जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:33+5:302021-09-02T05:24:33+5:30

सातारा : राज्य शासनाने सोमवारी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा ...

Transfer of officers in the district agriculture department | जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

सातारा : राज्य शासनाने सोमवारी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा बीज प्रमाणिकरण यंत्रणा कृषी अधिकारीपदी समीर वाळके यांची बदली झाली आहे.

राज्य शासनाने कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली यादी जाहीर केली. त्यानुसार आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील कृषी मंडल कृषी अधिकारी समीर वाळके यांची साताऱ्यात जिल्हा बीज प्रमाणिकरण यंत्रणेत बदली झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांची फलटण तालुका कृषी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. पुणे कृषी आयुक्तालय येथील तंत्र अधिकारी (सांख्यिकी) समीर पवार यांची सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच वाई तालुका कृषी अधिकारी एच. डी. धुमाळ आता सातारा तालुका कृषी अधिकारी असतील. पाटण तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे यांची ठाणे येथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

सातारा तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ हे ठाणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तंत्र अधिकारी असतील, तर संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे हे आता वाई तालुका कृषी अधिकारी असणार आहेत. याचबरोबर इतरही काही अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया जाहीर केली आहे.

.........................................................................

Web Title: Transfer of officers in the district agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.