शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पावसाचा धुमाकुळ; पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाणी साचल्याने एक तास वाहतूक पडली बंद

By नितीन काळेल | Updated: May 21, 2025 18:26 IST

उंब्रज/सातारा : सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी ...

उंब्रज/सातारा : सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते.पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावरुन पावसाचे पाणी बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने महामार्गावर पाणी साचले. त्यामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होताच महामार्गाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पावसातच मजुरांनी शक्य होईल तसे रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान साचलेल्या पाण्यातूनच वाहतूक सुरु होती. उंब्रज बाजूला वाहनाची रांग लागली होती. यातच एक वाहन महामार्गावर बंद पडले त्यामुळे वाहतूक बंद पडली. हे वाहन बाजूला काढून पुन्हा वाहतूक सुरू करण्यासाठी सुमारे एक तास गेला. वाहतुकीची कोंडींमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते.साताऱ्यात भिंत पडली, दुपारीच धो-धो; वाऱ्याने झाडे कोसळू लागलीमे महिना असला तरी जिल्ह्यातील पारा खालावला असून वळीवच पावसाळा असल्यासारखा धो-धो पडू लागला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, दुकानात पाणी घुसणे तसेच वाऱ्याने झाडे कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बुधवारी तर दुपारच्या सुमारासच साताऱ्यात धो-धो पाऊस पडला. त्यातच पाऊस उशिरापर्यंत पडल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.खोलगट भागातील रस्त्यावर पाणी तुंबून राहिले. अशा पाण्यातूनच नागरिक तसेच वाहनधारकांनाही वाट काढावी लागली. शहरातील कमानी हाैद भागात एक भिंतही कोसळली. त्यातच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा फटका नागरिक तसेच व्यावसायिकांनाही बसत आहे.माण तालुक्यात फळबागाचे नुकसानमाण तालुक्यात तर पावसाने दैना उडवून दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस आणि वाऱ्याने डाळिंबाची झाडे आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषकरून हा पाऊस फळबागधारकांसाठी नुकसानकारकच ठरलेला आहे तसेच पाटण, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यांतही चांगला पाऊस झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसhighwayमहामार्ग