वाहतूक नियमांचे पालन करावे : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:45+5:302021-02-06T05:14:45+5:30

ढेबेवाडी (ता. पाटण) येथे रहेबर ए जरिया फौंडेशन व ढेबेवाडी पोलीस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती करण्यात आली. ...

Traffic rules should be followed: Pawar | वाहतूक नियमांचे पालन करावे : पवार

वाहतूक नियमांचे पालन करावे : पवार

ढेबेवाडी (ता. पाटण) येथे रहेबर ए जरिया फौंडेशन व ढेबेवाडी पोलीस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. रहेबर ए जरिया फौंडेशनचे अध्यक्ष वसीमअक्रम शेख, नवाज सुतार, रसिक नदाफ, पोलीस कर्मचारी अजय माने, नवनाथ कुंभार, नवाज डांगे, जमीर डांगे, सर्फराज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

साहाय्यक निरीक्षक संतोष पवार म्हणाले, वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे. अती घाई केल्यास आपण स्वत:हून आपल्यावर संकट ओढवून घेऊन प्राणास मुकावे लागेल. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील. तसेच प्रवास सुखकर होईल.

यावेळी रहेबर ए जरिया फौंडेशनच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नवनाथ कुंभार यांनी स्वागत केले. अजय माने यांनी आभार मानले.

Web Title: Traffic rules should be followed: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.