वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:51+5:302021-03-19T04:38:51+5:30

फलटण : सासकल (ता. फलटण) हद्दीत सासकल गावच्या ओढ्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा १ लाख ५६ हजार रुपये किमतीची ...

Tractor-trolley transporting sand seized | वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

फलटण : सासकल (ता. फलटण) हद्दीत सासकल गावच्या ओढ्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा १ लाख ५६ हजार रुपये किमतीची ट्रॅक्टर व ट्रॉली फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास केली.

याबाबत माहिती अशी की, सासकल हद्दीतील ओढ्यामध्ये बुधवारी मध्यरात्री पोपट मल्हारी खोमणे (वय २९, रा. सासकल) हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर व त्यास पाठीमागे निळ्या रंगाच्या ट्रॉलीमध्ये बिगर परवाना एक ब्रास वाळूची वाहतूक करीत असताना आढळून आला. १ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची ट्राॅली व ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Tractor-trolley transporting sand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.