कासपुष्प पठारावर पर्यटकांची मांदियाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:57+5:302021-08-28T04:43:57+5:30

शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता व जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असणाऱ्या कास पठारावरील विविधरंगी रानफुलांचा फुलोत्सव २५ ऑगस्टपासून खुला झाला ...

Tourists start flocking to Kaspushpa plateau | कासपुष्प पठारावर पर्यटकांची मांदियाळी सुरू

कासपुष्प पठारावर पर्यटकांची मांदियाळी सुरू

शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता व जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असणाऱ्या कास पठारावरील विविधरंगी रानफुलांचा फुलोत्सव २५ ऑगस्टपासून खुला झाला असून बहुसंख्य पर्यटक फुलोत्सवाचा स्वानुभव घेत आहेत. ३१ऑगस्टपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार असून १ सप्टेंबरपासून मात्र ऑनलाईन पद्धतीनेच बुकिंग केलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.

पर्यटकांना बुकिंग साठी www.kas.ind.in या वेबसाईटवर जाऊन आगावू प्रवेश शुल्क भरून अगोदरच बुकिंग करावे लागणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचे नियम पाळून हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून प्रति पर्यटक १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. कास पठार कार्यकारी समितीने १४० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची हंगामासाठी नेमणूक केली असून वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, निवारा शेड, तिकीट घर, गाईड आदी व्यवस्था सुरळीत केल्या आहेत. वाहनतळ ते पठार अशी बससेवा समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. कास पठाराबरोबरच पर्यटक परिसरातील बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेले बामणोली, सर्वाधिक उंचीचा वजराई धबधबा, एकीवचा धबधबा, नारायण महाराज मठ (शेंबडी), सह्याद्रीनगर येथील पवनचक्या आदी परिसरातील पर्यटनस्थळाना पर्यटक भेटी देत आहेत. ऊनपावसाचा खेळ, धुके या आल्हादायक वातावरणामुळे परिसरातील निसर्गसौंदर्य पाहता धरतीवरील हा स्वर्ग पर्यटनासाठी नटला आहे.

Web Title: Tourists start flocking to Kaspushpa plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.