शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:30 IST

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक ...

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने गुरुवार, दि. ४ सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरुवात करत चालू हंगामाचे उदघाटन उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, समिती अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे, सदस्य दत्ता किर्दत, प्रदीप कदम, ज्ञानेश्वर आखाडे, विमल शिंगरे, विठ्ठल कदम, तानाजी आटाळे, दत्ता बादापुरे, पांडुरंग शेलार, सीताराम बादापुरे, विकास किर्दत, सोमनाथ बुढळे, वर्षा बादापुरे, कांचन किर्दत सर्व समिती सदस्य, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.पहिल्याच दिवशी दिवसभरात ऑनलाइन, ऑफलाइन मिळून शेकडो पर्यटकांनी कासला भेट दिली. फुलांच्या वाढीसाठी पोषक वातावरण होत असल्याने कास पठारावर काही प्रकारची फुले तुरळक प्रमाणात बहरून येत्या काही दिवसातच गालीचे पाहावयास मिळणार आहेत. गेंदला चांगल्या प्रकारे बहर आहे. पर्यटकांना सुरक्षितता व सुखसुविधा देण्यासाठी वनविभाग व कार्यकारिणी समितीकडून सुरक्षारक्षक व गाइडची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, सोनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरुपात बहर आला असून, पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. पठारावरील गेंद, सीतेची आसवे, चवर, कुमुदिनी फुलांना बहर आला असून, उर्वरित इतर फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतानाचे चित्र आहे. ई-व्हेइकल, बैलगाडीतूनही सफर होणार आहे.

पठारावर एकूण १३२ जणांना रोजगार उपलब्ध होत असून, महिला स्वयंसेवकही कार्यरत आहेत. वनसंपदेचे संरक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगार या गोष्टी केंद्रबिंदू मानून समितीचे कार्य सुरू आहे. फुले पाहात असताना पर्यटकांनी येथील दुर्मीळ फुलांची काळजी घ्यावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.-संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल, सातारा