शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची रात्र बसस्थानकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:35 IST

महाबळेश्वर : पर्यटकांचा मे महिन्यातील शेवटचा हंगाम असल्याने महाबळेश्वर व पाचगणीला अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले आहे. शनिवार व रविवारी दोन्ही पर्यटनस्थळे गर्दीने बहरून गेली. दरम्यान, येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध न झाल्याने पर्यटकांना अख्खी रात्र बसस्थानक व परिसरात काढावी लागली. हॉटेलच्या दरांमध्ये अचानक वाढ झाल्याने काही पर्यटकांमधून नाराजीही व्यक्त करण्यात ...

महाबळेश्वर : पर्यटकांचा मे महिन्यातील शेवटचा हंगाम असल्याने महाबळेश्वर व पाचगणीला अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले आहे. शनिवार व रविवारी दोन्ही पर्यटनस्थळे गर्दीने बहरून गेली. दरम्यान, येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध न झाल्याने पर्यटकांना अख्खी रात्र बसस्थानक व परिसरात काढावी लागली. हॉटेलच्या दरांमध्ये अचानक वाढ झाल्याने काही पर्यटकांमधून नाराजीही व्यक्त करण्यात आली.निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या महाबळेश्वर व पाचगणीत देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. बाजारपेठेसह सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून जात आहेत. राज्यात सर्वत्र तापमान वाढ झाली असताना वेण्णा लेक परिसरांत मात्र सायंकाळी दाट धुके पसरत आहेत. या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरातील ब्रिटिशकालीन पॉर्इंटही पर्यटकांनी गजबजून जात आहेत.दरम्यान, शनिवार व रविवार सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर गुजराती पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. निवाºयासाठी हॉटेल उपलब्ध न झाल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी रात्री बसस्थानक परिसरात झोपावे लागले. रविवारी काही हॉटेलचे रूम रिकामे झाल्यानंतर या पर्यटकांच्या निवाºयाची व्यवस्था झाली. दरम्यान, उन्हाळी हंगामाचा शेवटचा आठवडा असल्याने सर्वच हॉटेलचे रूम्स भाडे दुप्पट, तिप्पट झाल्याने पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटले. पर्यटकांची संख्या पाहता दोन दिवसांमध्ये खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.मॅप्रो गार्डनजवळ वाहतूक कोंडीकाही पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची दमछाक होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने मोठा फौजफाटा शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांच्या वतीने वाहतूक निवारणाचे काम केले जात असले तरी महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर असलेल्या मॅप्रो गार्डन येथे पर्यटकांना वाहतूक कोंडी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.