घाटाईफाटा ते कास पठारदरम्यान पर्यटकांची चारचाकी पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST2021-09-16T04:48:33+5:302021-09-16T04:48:33+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठार व घाटाईफाटादरम्यान कारचा मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्याआसपास अपघात होऊन एकजण ...

घाटाईफाटा ते कास पठारदरम्यान पर्यटकांची चारचाकी पलटी
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पठार व घाटाईफाटादरम्यान कारचा मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्याआसपास अपघात होऊन एकजण किरकोळ जखमी झाला. दरम्यान, कारमध्ये एका लहान मुलासमवेत तिघे प्रवासी पर्यटक होते.
कास पठाराहून साताऱ्याकडे येताना घाटाई फाटा ते कास पठारदरम्यान (एमएच ४८ एडब्ल्यू ०२७५) कारच्या चालकाचा ताबा सुटून चारचाकी कार डाव्या बाजूस नाल्यामध्ये पलटी झाली. दरम्यान, बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमीवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी साताऱ्याला पाठविले.
(चौकट)
कास पठार कार्यकारी समितीकडून मदत...
कास पठार कार्यकारी समितीचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना गाडीतून त्वरित बाहेर काढून प्रथमोपचार केले. तसेच त्यांना पुढील मदत मिळेपर्यंत पठारावरील निवारा शेडमध्ये बसवून मानसिक आधार व धीर दिला. टोव्हिंग व्हॅन बोलावून अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यासाठी मदतदेखील केली. समितीच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीबद्दल अपघातग्रस्तांनी समितीचे आभार मानले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे यांनी दिली.
( छाया सागर चव्हाण )