सातारा येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: October 31, 2014 00:48 IST2014-10-31T00:45:49+5:302014-10-31T00:48:58+5:30
काशीद समुद्रातील दुर्घटना : दोघे अत्यवस्थ

सातारा येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू
बोर्ली-मांडला (जि़ रायगड) : मुरूड तालुक्यातील काशीद येथे पर्यटनासाठी आलेले साताऱ्यातील तीनजण बुडाल्याची घटना आज, गुरुवारी सायंकाळी घडली़ यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना अलिबागच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
ओमकार पवार असे मृताचे नाव असून, अनुप प्रताप तिबातले (वय २३), सुमित बाळा रणपिसे (२३) अशी जखमींची नावे आहेत़
सातारा येथील ओमकार पवार, अनुप प्रताप तिबातले, सुमित बाळा रणपिसे यांच्यासह सातजणआज काशीद येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते समुद्रात गेले. ओमकार, अनुप आणि सुमित यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. त्यातील ओमकारचा मृत्यू झाला. (वार्ताहर)