तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:34+5:302021-09-05T04:43:34+5:30
उत्तमप्रकारे पीक आणल्याने सुमारे २५ हजार किलो उत्पादन मिळाले. बाजार सुरळीत सुरू असल्यास एकरी तीन ते चार लाख रुपये ...

तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच!
उत्तमप्रकारे पीक आणल्याने सुमारे २५ हजार किलो उत्पादन मिळाले. बाजार सुरळीत सुरू असल्यास एकरी तीन ते चार लाख रुपये इतके उत्पादन मिळते. मात्र सध्या बाजारात दर नसल्याने फायदा राहिला बाजूला, झालेला खर्च न निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत, अशी खंत धुमाळवाडी येथील शेतकरी समीर पवार यांनी व्यक्त केली.
कोट
जनावरांना खाऊ घालण्याची वेळ
टोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख पन्नास हजार रुपये ते एक लाख साठ हजार रुपये खर्च येतो; मात्र या पिकामधून उत्पन्नही चांगले मिळते. मात्र चालू हंगामात सगळीकडे कोरोनामुळे बाजारात दर मिळत नसल्याने तोडणी खर्च व बाजारपेठ वाहतूक करून आणखी कर्जबाजारी होण्यापेक्षा टोमॅटो मेंढरांना चारा म्हणून अथवा शेतातच न तोडता ठेवावा लागत आहे, अशी माहिती समीर पवार यांनी दिली.
०४वाठार निंबाळकर-टोमॅटो
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर परिसरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन निघाले; मात्र दराअभावी ते तसेच सोडून देण्याची वेळ आली आहे.