शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाल सोनं दहा किलोला तीनशे रुपये, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान

By दीपक शिंदे | Updated: June 14, 2023 12:01 IST

कधी सोनं, तर कधी चिखल

कोपर्डे हवेली : टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे रेड गोल्ड म्हणून पाहत असतो. गेल्या आठ महिन्यांपासून टोमॅटो दराने निच्चांकी दर गाठल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दरात सुधारणा होत असून, मुंबई बाजारपेठेत सध्या दहा किलोला दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.शेतकऱ्यांना पेसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी टोमॅटो पिकाकडे पाहत असतात. पण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने आणि तुलनेत दर कमी मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडून अनेकांनी या पिकाकडे पाट फिरविली आहे.एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन खर्च येत आहे. त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात टोमॅटोचे क्षेत्र घटले आहे.कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आपला टोमॅटो विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेबरोबर मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद आदी ठिकाणी पाठवत असतात. सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात सुधारणा होत आहे. १ जूनला दहा किलोचा दर ८० ते १०० रुपये होता. त्यात सुधारणा होऊन १२ जूनला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, शिरवडे, नडशी, काले, विंगसह इतर गावांतील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत असतात. दरात सुधारणा झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान दिसून येत आहे.

टोमॅटो पीक हे आमच्या दृष्टीने सोनंच आहे. आमचा एका एकारमध्ये टोमॅटोचे पीक आहे. अडीच लाख उत्पादन खर्च आला असून, उत्पादन खर्च निघून टोमॅटो तोडा मध्यावर आला आहे. तीनशेच्या दरम्यान असाच दर राहिला तर निव्वळ नफा पाच ते सहा लाख रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. - भाऊसाहेब चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी

दर वाढण्याची कारणे...- टोमॅटोचे घटते क्षेत्र- चाकरमानी मुंबईत दाखल- अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या बागा उद्ध्वस्त- सध्या मुंबईत विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू झाल्याने भाजीसाठी टोमॅटोला मागणी

कधी सोनं, तर कधी चिखलटोमॅटोचे पीक हे एक झुगार ठरत आहे. दरवेळी दर मनासारखा मिळत नाही. दर मिळाला तर मालामाल करते आणि नाही मिळाला तर कर्जात लोटते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी