कोपर्डे हवेली परिसरात टोमॅटोचे तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:27+5:302021-06-16T04:50:27+5:30
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसर हा टोमॅटोचे आगार म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात टोमॅटोची लागण केली होती. त्याचे ...

कोपर्डे हवेली परिसरात टोमॅटोचे तोड
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली परिसर हा टोमॅटोचे आगार म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात टोमॅटोची लागण केली होती. त्याचे तोडे सुरू होऊन मुंबई बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
कोपर्डे हवेली परिसरातील पार्ले, कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, नडशी, शिरवडे आदी गावांत मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्यात मार्च-एप्रिल महिन्यात टोमॅटोची लागण केली जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तोडे सुरू होतात. सध्या शेतकरी टोमॅटो मुंबई बाजारपेठेत पाठवत आहेत. दहा किलोचा दर १०० ते ११० रुपयांपर्यंत भेटत आहे. हा दर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नाही. दर वाढेल या आशेवर शेतकरी वाट पाहत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत. उत्पादन खर्च पाहता दहा किलोचा दर दोनशे रुपयांच्या पुढे असेल तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील.