टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

By Admin | Updated: August 7, 2014 00:15 IST2014-08-06T22:31:40+5:302014-08-07T00:15:16+5:30

महामार्ग गेला खड्ड्यात! : पैसे देऊन दुखणं विकत घेतल्याच्या वाहनचालकांमधून प्रतिक्रिया

Toll 55 and pits 55 thousand! | टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

सातारा : एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम तेथील दळणवळणाची व्यवस्था दर्जेदार असायला हवी. सातारच्याबाबतीत मात्र उलटेच घडत आहे. दुपदरी महामार्गाचे चारपदरीकरण झाले. सहापदरीकरणाचे कामही सुरू झाले, मात्र पुढचे पाठ मागचे सपाट याप्रमाणे महामार्गाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, खेड्यापाड्यातले रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गाची ऐशी-तैशी झाली तरी वाहनधारकांकडून टोल मात्र सहापदरीकरणाचा वसूल केला जात आहे.

सहापदरीकरणाचे काम बंद...
महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम, साईडपट्ट्यांची अर्धवट कामे अपघातास निमंत्रण देत आहे. सहापदरीकरणाचा टोल वसूल केला जातो, मात्र तशा सुविधा मिळत नसल्याने मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
सेवारस्त्यांची
ऐशी-तैशी
शिरवळ : शिरवळला येताय? थांबा, अन्यथा अपघात होऊ शकतो, असे म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकरांवर आली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या कृपेने महामार्ग व सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांतून महामार्ग शोधावा लागत आहे. पावसामुळे महामार्ग आणि गावांना जोडणाऱ्या सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिरवळ येथे तर कोणता खड्डा चकवू, अशी अवस्था वाहनचालकांची होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साठल्यामुळे वाहनचालकांची मोठी पंचाईत होत आहे. खड्डे मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. पण अवघ्या दोन तासांतच जैसे थे परिस्थिती झाली आहे.

Web Title: Toll 55 and pits 55 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.