टोकलं सीताफळाचं बियाणं; फुलणार माळरान जोमानं..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST2021-07-20T04:27:03+5:302021-07-20T04:27:03+5:30
सातारा : माण तालुक्यातील माणदेश विकास फांउडेशनच्या वतीने देवापूर-शिरताव मार्गावरील वन विभागाच्या हद्दीत उजाड माळावर एक हजार सीताफळ बियांचे ...

टोकलं सीताफळाचं बियाणं; फुलणार माळरान जोमानं..!
सातारा : माण तालुक्यातील माणदेश विकास फांउडेशनच्या वतीने देवापूर-शिरताव मार्गावरील वन विभागाच्या हद्दीत उजाड माळावर एक हजार सीताफळ बियांचे टोकण करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी फळझाडाचे संगोपन व संवर्धनचा निर्धारही करण्यात आला. दरम्यान, यामुळे माळरानावर सीताफळाचा बहर येणार आहे.
सीताफळ बिया टोकणचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी विक्रम वीरकर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य सी. डी. व्हावळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उध्दव बाबर, जगन्नाथ वीरकर, शिवाजी माने, कृष्णा बाबर, चंद्रकांत शेंडे, सतेज पाटील, कैलास कांबळे, सुमीत बाबर, उद्योगपती श्रीकांत शेंडे, प्रा. एम. बी. नारायणकर, प्रा. एस. एस. बाबर, प्रा. दादाराम साळुंखे, प्रा. डी. डी. खटके, प्रा. एस. एस. गोडसे, प्रा. व्ही. पी. लवटे, चंद्रकांत शेंडे आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी विक्रम वीरकर म्हणाले, ‘सीताफळ हे अत्यंत काटक फळझाड असून त्याला शेळ्या, मेंढ्या व इतर प्राण्यापासून इजा पोहोचत नाही. त्यामुळे जनावरांपासून संरक्षण न करताही सीताफळाची जोपासणे होऊ शकते. शिवाय या झाडावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होतो. आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने लागवड अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे.
फोटो दि.१९ सातारा सीताफळ फोटो...
फोटो ओळ : माण तालुक्यातील देवापूर-शिरताव गावाच्या मार्गावर सीताफळ बियांचे टोकन करण्यात आले.
......................................................