‘सातारा लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापन दिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:46 IST2018-05-15T00:46:55+5:302018-05-15T00:46:55+5:30

‘सातारा लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापन दिन सोहळा
सातारा : चोखंदळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या ‘सातारा लोकमत’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत राधिका चौकातील राधिका संकुलमध्ये वाचकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याच्या लौकिकास साजेसे कार्य केलेल्यांना ‘लोकमत’ने कायमच प्रकाशझोतात आणण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने ‘लोकमत’ने आपल्यातीलच रोलमॉडेल समाजासमोर आणले आहेत. त्यातूनच ‘गुड न्यूज’ सातारकरांसाठी घेऊन येण्याची परंपरा ‘लोकमत’ने साताऱ्यात रुजवली. या उपक्रमाचे वाचकांनी नेहमीच स्वागत केले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाºया अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होत होते. त्यामुळे ’लोकमत’च्या पुढाकारातून अनेक सामाजिक संघटनांनी जवळपास पाच हजार ट्रॉलींना मोफत रेडियम बसविले. त्यानंतर ऊस वाहतूक करणाºया टॅÑक्टरच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. सकारात्मक बातम्या देत असतानाच समाजात चाललेल्या गैरकृत्यांवरही तिसरा डोळा ठेवण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. त्यामुळे अनेक ‘इनिशिएटिव्ह’ला यश आले आहे.
यामुळेच ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे. हे प्रेम आणखी जोपासण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत स्नेहमेळावा आयोजित केला आहे.