सातारा, जावळी बाजार समितीसाठी आज मतदान
By Admin | Updated: August 9, 2015 00:49 IST2015-08-09T00:24:18+5:302015-08-09T00:49:19+5:30
शासकीय यंत्रणा सज्ज : ४ हजार २४८ मतदार बजावणार हक्क

सातारा, जावळी बाजार समितीसाठी आज मतदान
सातारा : सातारा, जावळी-महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी (दि. ९) मतदान होणार आहे. मतदानासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सातारा बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी दिली.
सातारा बाजार समितीच्या ११ जागांसाठी हे मतदान होणार आहे. सोसायटी मतदारसंघात सात जागांसाठी नितीन कणसे, बाबासो घोरपडे, रमेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, विक्रम पवार, किरण साबळे, हेमंत सावंत, अनिल साळुंखे हे आठ उमेदवार उभे आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघाच्या दोन जागांसाठी श्रीरंग देवरुखे, अभय पवार, सतीश माने, जयवंत मोरे हे उमेदवार उभे आहेत. व्यापारी मतदारसंघात राहुल घाडगे, राजन चतूर, सुनील झंवर, दिलीप ताटे, सोमनाथ धुमाळ हे उमेदवार उभे आहेत.
नानासो गुरव (इतर मागास गट), रघुनाथ जाधव (भटक्या जमाती), शैलेंद्र आवळे (अनु. जाती), अनिल जाधव (हमाल तोलारी), शंकरराव किर्दत (कृषी प्रक्रिया), अशोक चांगण (आर्थिक दुर्बल घटक), अलका पवार, शालन कदम (महिला राखी) हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानकेंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती संजय सुद्रिक
यांनी दिली. (प्रतिनिधी)