शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

सातारा : तळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा, ४७ गावांची तहान अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 14:10 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळहिरा, अरबवाडी तलावातून बेसुमार पाणी उपसा४७ गावांची तहान अवलंबून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात समस्या निर्माण होणार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांची तहान भागवणाऱ्या तळहिरा आणि अरबवाडी पाझर तलावांतून सध्या दररोज सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे हे तलाव रिकामे होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष न घातल्यास या भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे दिवाळीनंतर अनेक गावांतून पाणी टँकरची मागणी होत असते. गेल्या दोन वर्षांत या भागात झालेल्या जययुक्त शिवारच्या कामामुळे बरीच गावे आज टँकरमुक्त झाली आहेत. तर अनेक गावांचे भवितव्य हे या भागातील असलेल्या पाझर तलावातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे.या भागातील तळहिरा, नांदवळ आणि अरबवाडी हे प्रमुख तलाव गेल्यावर्षीच्या पावसात केवळ ५० टक्के भरले होते. तर वसना नदीवरील नांदवळ पाझर तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र, या सर्व तलावांतून सध्या रात्री आणि दिवसाही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे हे तलाव आता रिकामे होऊ लागले आहेत.तळहिरा, अरबावाडी तलावांतून तर दिवसाही खुलेआम अनेक विनापरवाना मोटारीद्वारे पाणी उपसा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही या विभागाने कानावर हात ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.अरबावाडी तलावाचा आधार या भागातील अरबवाडी, अंबवडे, बनवडी, इब्राहमपूर, खामकरवाडी या गावांना आहे. तर तळहिरा पाझर तलावावर तळिये, वाठार स्टेशन, देऊर या गावांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणी उपसा थांबविण्याचे काम जिल्हाधिकाºयांनी करावे, अशी या भागातील ग्रामस्थातून मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी