शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गारपिटीसह वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:34 AM

कºहाड : शहरासह तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शहरातही दत्त चौकासह अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर झाडे मोडून पडली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.कºहाड शहरासह गत काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. ...

कºहाड : शहरासह तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शहरातही दत्त चौकासह अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर झाडे मोडून पडली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.कºहाड शहरासह गत काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच रविवारी दुपारी शहरासह तालुक्यातील कोपर्डे हवेली, सैदापूर, ओगलेवाडी, मलकापूर, चचेगाव, पाचवड, ओंड, उंडाळे, नांदगाव, वारुंजी, केसे, सुपने या भागात जोरदार पावसासह वादळी वाºयाचा तडाखा बसला. कºहाडसह आसपासच्या उपनगरांमध्ये वाºयामुळे झाडे मोडून पडली. शहरातील दत्त चौक, शाहू चौक या परिसरात रस्त्यानजीक असलेली झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच गारपिटीमुळेही वाहने जागीच थांबविण्यात आली होती. तालुक्यात काही ठिकाणी बहरात आलेल्या आंब्यांचा झाडाखाली फळांचा खच वडला होता. वादळी वारे, गारपिटीसह सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अचानक झालेल्या या पावसाने शहरातील सखल भागासह रस्त्यावरही तळे साचले होते. पाण्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागत होती. तालुक्यातील काही गावांमध्ये शेतात पाणी साचले होते. तर मुख्य रस्त्यांवर असणारे खड्डे भरल्याने तेथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर मोडून पडलेली झाडे हटविण्यात आली. तसेच सखल भागात साचलेले पाणीही काढण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.दुकानांचे फलक वाºयावरकºहाडात अनेक व्यावसायिक आपल्या दुकानांचे लहान फलक रस्त्यानजीक उभे करून ठेवतात. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयामुळे बहुतांश दुकानांचे फलक अक्षरश: वाºयासोबत उडून गेले. शहरातील चावडी चौकात असणाºया एका हॉटेलचा फलक तर वीज वाहिन्यांवर जाऊन अडकला होता. हे फलक गोळा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत व्यावसायिकांची धावाधाव सुरू होती.