शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

अंगठाछापही सरपंचपदाचे दावेदार! गावभर बोभाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:13 IST

sarpanch Grampanchyat Sataranews- गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च्या आधी जन्माला आलेला गावकारभारी जरी अंगठा छाप असला तरी तो ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदाचादेखील दावेदार ठरु शकतो!

ठळक मुद्देअंगठाछापही सरपंचपदाचे दावेदार! गावभर बोभाटा १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना ७ वी पासची अट

सागर गुजरसातारा : गावकारभार हाकण्यासाठी गावगुंडी आली म्हणजे बास झालं...त्याला कशाला लागतंय शिक्षण! सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले तरुण किमान ७ वी पास तरी पाहिजेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मात्र १९९५ च्या आधी जन्माला आलेला गावकारभारी जरी अंगठा छाप असला तरी तो ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून येऊन सरपंचपदाचादेखील दावेदार ठरु शकतो!मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४0 नुसार १ जून १९५९ मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला राज्यामध्ये २८ हजारांच्यावर ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. शासनाने त्रिस्तरीय शासन पध्दतीचा स्वीकार १९६१ मध्ये केला. या घटनेला तब्बल ५९ वर्षे उलटली आहेत. पुलाखालून बरेच पाणी निघून गेलेय. राजकारणात तेव्हाही अंगठा छाप मंडळींचे वर्चस्व होते आणि अजूनही ते कायम आहे, असंच खेदानं म्हणावं लागत आहे. कारण ग्रामसेवक, लिपिक आणि तलाठी व्हायचं असेल तर किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आणि सरपंच व्हायचं म्हटलं तर अंगठाछापही चालतंय!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा पुरोगामी विचारांच्या विद्वानांनी महाराष्ट्र घडविण्यात योगदान दिले. मात्र सध्याच्या काळात धोरण ठरविणाऱ्यांची मानसिकता बदलत नसल्याने महाराष्ट्रात शिक्षितांचा वर्ग राजकारणापासून बाजूला फेकला जात असल्याचे चित्र आहे.त्रिस्तरीय शासन व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांच्या कारभाराला महत्त्व आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. आता सरकार बदलले असले तरी हा निर्णय कायम आहे. गावचा कारभार हाकणाºया सरपंच आणि सदस्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. हीच मंडळी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतील तर गावचा विकास कशा पध्दतीने साधला जात असेल हे सांगावे लागेल काय?धोरण ठरविणाऱ्यांचे शिक्षण तपासावे!निवडणूक आयोगाने नुकत्याच एका आदेशाने १९९५ नंतर जन्मलेला व्यक्ती जर ग्रामपंचायत लढवू इच्छित असेल तर तो किमान ७ वी पास असावा, असे घोषित केलेय. निवडणूक आयोगाची यंत्रणा जर स्वायत्त असेल तर निवडणुकीतील उमेदवारांच्या शिक्षणाबाबत ती निर्णय घेऊ शकत नाही का? असा सवाल उपस्थित होतो. प्रशासकीय यंत्रणेवर ज्यांचा अंमल चालतो, त्यांचेही ह्यशिक्षणह्ण तपासण्याचीच वेळ आता आलीय!शिपाई ग्रॅज्युएट अन सदस्य सातवी पासहातात डिग्री असूनही रोजगार मिळत नसल्याने अनेक तरुण मिळेल ती नोकरी करत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये मानधन तत्वावर पदवीधारक तरुण शिपाई पदावरदेखील काम करत आहेत. मात्र, त्यांना कामे लावणाºया ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्याची शैक्षणिक पात्रता काय तर केवळ सातवी पास!

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर