सहा हजार स्पर्धकांनी अनुभवला रोमांच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 14:00 IST2017-09-17T13:55:14+5:302017-09-17T14:00:57+5:30
सातारा शहरात हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सहाव्या हिल मॅरेथॉन स्पर्घेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देशभरातील हजारो स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर पूर्ण करताना अबालवृद्धांचा उत्साह जराही कमी झाला नाही.

सहाव्या हिल मॅरेथॉन स्पर्घेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देशभरातील हजारो स्पर्धकांनी स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
पेट्री (सातारा), दि. 17 : सातारा शहरात हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सहाव्या हिल मॅरेथॉन स्पर्घेत यंदा सहा हजारांहून अधिक स्पर्धक धावले. यवतेश्वर डोंगराचा नागमोडी घाट अन् हिरव्या निसर्गाच्या साक्षीने देशभरातील हजारो स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. स्पर्धेचे २१ किलोमीटर अंतर पूर्ण करताना अबालवृद्धांचा उत्साह जराही कमी झाला नाही.
पोलिस परेड मैदान ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट व पुन्हा पोलिस परेड मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरु झाली. स्पर्धसाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी केली होती. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्पर्धेच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जागोजागी आरोग्य पथकाच्या रुग्णरूग्णवाहिकाही सज्ज होत्या.
स्पर्धकांच्या संख्येत वाढ
गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये देश विदेशातील सुमारे ५ हजार ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदा मात्र, स्पर्धकांच्या संख्ये वाढ झाली. तब्बल ६ हजार ३०० स्पर्धकांनी घाटातील अनोख्या मॅरेथॉनचा थरार अनुभवला.
यवतेश्वर घाटाचे रूप बदलले
स्पर्धकांच्या आगळ्या-वेगळ्या वेशभूषेमुळे यवतेश्वर घाटाला वेगळेच सौंदर्य आले होते. अनेकांनी हे चित्र आपल्या कॅमेरॅत बंदिस्त केले. घाटातील निखळ झºयातील पाणी तोंडावर मारून स्पर्धक पुढे जात होते.
घुमला ढोल ताशाचा निनाद
ढोल-ताशा पथकांच्या वतीने स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यत आले. यवतेश्वर घाट ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेला होता. नागरिकांच्या वतीने ‘जय भवानी... जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊन स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्यात आले.
अधिकाºयांसह लोकप्रतिनिधी धावले
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह आमदार शिवेंद्र्रसिंहराजे यांनी देखील हिल मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेकांना प्रेरणा दिली. त्यांच्यासमवेत वेदांतिकाराजे भोसले याही सहभागी झाल्या.
उलट दिशेने पळून केली स्पर्धा पूर्ण
मुंबईच्या एका स्पर्धकाने उलट दिशेने धावून एकवीस किलोमीटरची ही स्पर्धा यशस्वी पूर्ण करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दीपक कनल असे या स्पर्धकाचे नाव. ‘लोकमत’शी बोलताना कनल म्हणाले, ‘या स्पर्धेत देश विदेशातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा फारच वेगळी आहे. घाटातील अवघड अशा ट्रॅकवरून धावताना आनंद वाटला. येथील निसर्ग अप्रतिम आहे. प्रथमच मी या स्पर्धेत सहभागी झालो असुन काही तरी वेगळे करावे, या उद्देशाने मी हाती राष्ट्रध्वज घेऊन उलट दिशेने पळून ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली. इतर स्पर्धकांना प्रेरणा मिळावी हाच या मागचा उद्देश होता.’