शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बादलीत बुडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:11 IST

खेळता-खेळता बादलीत पडून तीन वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी दुपारी घडली. मृत बालिका ही कर्नाटक राज्यातील आहे.

ठळक मुद्देबादलीत बुडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यूसोनगाव येथील दुर्देवी घटना : मृत मुलगी कर्नाटकातील

सातारा : खेळता-खेळता बादलीत पडून तीन वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सातारा तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी दुपारी घडली. मृत बालिका ही कर्नाटक राज्यातील आहे.चिनू यल्लाप्पा दोडमणी (वय ३, रा. ओवीअळी, ता. मुद्याहाळ. जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे दुर्देवी बालिकेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यल्लापा दोडमणी हे वीटभट्टीवर काम करतात. दर वर्षी ते पत्नीसमवेत सोनगाव येथे काम करण्यासाठी येत असतात.

महिनाभरापूर्वी ते कुटुंबीयासमवेत सोनगाव येथे कामासाठी आले. दरम्यान, सोमवारी दुपारी यल्लापा हे घरात जेवण करत होते. त्यावेळी पत्नी यल्लामा या झोपडीसमोर कपडे धूत होत्या. कपडे धूऊन झाल्यानंतर बादलीमध्ये पाणी तसेच ठेवून त्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेल्या. यावेळी तीन वर्षाची चिनू ही खेळत-खेळत बादलीजवळ आली.

बादलीतील पाण्यात हात घालून ती खेळत होती. त्यावेळी तिचा अचानक तोल गेल्याने ती बादलीत पडली. तोंड खाली आणि पाय वर झाले. बऱ्याच वेळ हा प्रकार कोणाच्या निदर्शनास आला नाही. जेवण करून वडील झोपडीतून बाहेर आले. त्यावेळी चिनूचे बादलीतून पाय वर दिसले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन चिनूला बादलीतून बाहेर काढले. मात्र, चिनू निपचित पडली होती. मोटारसायकलवरून चिनूला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.यल्लाप्पा दोडमणी यांना दोन मुले व एकुलती एक मुलगी होती. तिचा अशा प्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने दोडमणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चिनूचा मृतदेह अत्यंविधीसाठी कर्नाटकला नेण्यात आला.आई पाणी ओतण्यास विसरली..कपडे धुऊन झाल्यानंतर यल्लामा या नेहमी बादलीतून पाणी तेथील झाडांना ओतत होत्या. मात्र, सोमवारी घाईगडबडीत त्या बादलीतील पाणी ओतणे विसरल्या आणि कामावर निघून गेल्या. बादलीतील पाणी आपल्या मुलीचा कर्दनकाळ ठरेल, हे त्यांना वाटले नव्हते. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी बादलीतील पाणी ओतण्यास विसरल्याने स्वत:ला दोष देत आक्रोश केला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर