जेसीबीची बॅटरी चोरताना तिघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:07+5:302021-02-05T09:20:07+5:30
सातारा : येथील समर्थनगर परिसरात एका घराशेजारी पार्क केलेल्या जेसीबीची बॅटरी दुचाकीवरुन चोरून नेत असताना एका एका बांधकाम व्यावसायिकाने ...

जेसीबीची बॅटरी चोरताना तिघांना पकडले
सातारा : येथील समर्थनगर परिसरात एका घराशेजारी पार्क केलेल्या जेसीबीची बॅटरी दुचाकीवरुन चोरून नेत असताना एका एका बांधकाम व्यावसायिकाने तिघांना पकडले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
विकास घाडगे, अलका घाडगे आणि सुरेखा जाधव अशी चोरी करताना पकडलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आजीनाथ शिवशंकर शिराळ (वय ४८, रा. शिवराजा बंगला, निशीगंधा कॉलनी, समर्थनगर, ता. सातारा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हले आहे की, राहत्या घराशेजारील पार्किंगमध्ये जेसीबी (एमएच ११ - सीजी ४९४४) पार्क केला होता. शुक्रवार, दि. २९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेसीबीमधील चार हजार रुपये किमतीची बॅटरी विकास दत्तू घाडगे (वय ३५), अलका विकास घाडगे (वय ३०), सुरेखा शिवाजी जाधव (तिघे रा. सैदापूर, ता. सातारा) या तिघांनी काढली. यानंतर हे तिघेही विकास घाडगे याच्या दुचाकीवरून चोरून नेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या तिघांनाही आजीनाथ शिराळ यांनी पकडले. यावेळी सुरेखा जाधव तेथून पळून गेली.
घटनास्थळी चोरी करताना पकडलेल्या विकास आणि अलका या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पळून गेलेल्या सुरेखा हिला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अटक केली. अधिक तपास पोलीस नाईक सुतार हे करत आहेत.