पुसेगावात होणार तीन हजार किलो बुंदी

By Admin | Updated: December 14, 2014 23:46 IST2014-12-14T22:55:41+5:302014-12-14T23:46:34+5:30

सेवागिरी यात्रा : भाविकांना मिळणार लाडूचा प्रसाद

Three thousand kilo kundi will be damaged in Pusgaon | पुसेगावात होणार तीन हजार किलो बुंदी

पुसेगावात होणार तीन हजार किलो बुंदी

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा कालावधीत येणाऱ्या लाखो भाविकांना ट्रस्ट व भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत बुंदी प्रसाद वाटप करण्यात येते. यावर्षी तीन हजार किलोची बुंदी तयार करण्यासाठी ३० क्विंटल बेसन, ३० क्विंटल साखर व १८० शुद्ध तेलांचे डबे वापरण्यात आले आहेत.
बुंदी प्रसाद तयार करण्याच्या भट्टीचा शुभारंभ श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व भाविकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजीराव घाडगे, माजी उपसरपंच संतोष जाधव, सदाशिव जाधव, दिलीप बाचल, आबूशेठ मुलाणी, बाळासाहेब जाधव, चंदू जाधव, रघुनाथ दळवी, वैभव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Three thousand kilo kundi will be damaged in Pusgaon