सातार्यात तीन दुकाने फोडली
By Admin | Updated: June 4, 2014 23:58 IST2014-06-04T23:58:29+5:302014-06-04T23:58:53+5:30
लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला

सातार्यात तीन दुकाने फोडली
सातारा : येथील विसावा नाका परिसरातील तीन दुकाने फोडून अज्ञाताने लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. याबाबत समजलेली माहिती अशी की, विसावा नाका परिसरातील तीन दुकाने अज्ञाताने मध्यरात्रीच्या सुमारास फोडली. यावेळी चोरट्याने दुकानातील साहित्य चोरून नले. या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती. दरम्यान, सातारा शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून यावर पोलिसांना अद्याप कोणताही अंकुश ठेवता आला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)