पर्स चोरणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:05+5:302021-01-08T06:04:05+5:30

याबाबतची फिर्याद संगीता हणमंत चव्हाण (रा. कार्वेनाका, कराड) यांनी उंब्रज पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीला दुपारी ...

The three purse thieves were chased and caught | पर्स चोरणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

पर्स चोरणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले

याबाबतची फिर्याद संगीता हणमंत चव्हाण (रा. कार्वेनाका, कराड) यांनी उंब्रज पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संगीता चव्हाण या पाल येथील खंडोबा मंदिरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी श्रावण कांबळे, पूनम कांबळे, प्रियांका कांबळे यांनी त्यांच्या ताब्यातील पर्स जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून जाण्यास सुरुवात केली. संगीता यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्याठिकाणी बंदोबस्तास असणारे पोलीस कर्मचारी कृष्णात जाधव, गृहरक्षक अमोल निकम, गणेश जरक, विक्रम खांडके व दत्तात्रय खंडाईत यांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर कराड शहर, ढेबेवाडी, इस्लामपूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही पाकीटमार टोळी सराईत आहे. आरोपींना कराड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने श्रावण कांबळे याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार तपास करत आहेत.

Web Title: The three purse thieves were chased and caught