मिरजेत गॅस्ट्रोचे आणखी तीन रुग्ण
By Admin | Updated: December 4, 2014 00:48 IST2014-12-04T00:48:24+5:302014-12-04T00:48:59+5:30
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने आज तीन नवीन रूग्ण

मिरजेत गॅस्ट्रोचे आणखी तीन रुग्ण
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने आज तीन नवीन रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. गॅस्ट्रोची साथ पूर्णपणे नियंत्रणात असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे अतिसाराच्या रूग्णांवर उपचार सुरुच असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय रूग्णालयात आज चौगुले प्लॉट व संजय गांधीनगर येथील तीन अतिसाराचे रूग्ण दाखल झाले. गॅस्ट्रोमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण करून, अतिसाराची लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून जीर्ण व जुन्या जलवाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. साथ नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)