चाकू हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्यासह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:31+5:302021-01-09T04:33:31+5:30

शिरवळ : केसुर्डी येथील एका हॉटेल मालकाने माजी ग्रामपंचायत सदस्यावर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात माजी ...

Three injured in knife attack | चाकू हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्यासह तिघे जखमी

चाकू हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्यासह तिघे जखमी

शिरवळ : केसुर्डी येथील एका हॉटेल मालकाने माजी ग्रामपंचायत सदस्यावर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात माजी ग्रामपंचायत सदस्यांसह दोन्ही गटांतील तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून हॉटेल मालकासह दोन्ही गटांतील सहाजणांना अटक केली आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केसुर्डी याठिकाणी देवीलाल दादा जाधव (वय ३१, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा मूळ रा. शेनवड, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याने भाडेतत्त्वावर ‘हॉटेल गावकरी’ म्हणून हॉटेल चालविण्यास घेतले आहे. केसुर्डी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तुकाराम ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय ढमाळ हे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर हॉटेलच्या बाहेर सुनील ढमाळ व रामचंद्र ढमाळ यांच्याशी बोलत असताना हॉटेल मालक देवीलाल जाधव याने हॉटेलच्या बाहेर येत संजय ढमाळ यांना अचानकपणे मारण्यास सुरुवात केली. देवीलाल जाधव यांनी हॉटेलमध्ये परत जात चाकू व कोयता आणत ‘तुला सोडतच नाही,’ असे म्हणत संजय ढमाळ यांच्या तोंडावर, नाकावर, ओठांवर व हनुवटीवर चाकू मारल्याने संजय ढमाळ हे गंभीर जखमी झाले, तर प्रशांत ढमाळ याच्या हाताला सुरी लागल्याने तो जखमी झाला.

यावेळी सुनील ढमाळ व रामचंद्र ढमाळ हे भांडणे सोडवीत असताना देवीलाल जाधव व हॉटेलमधील कामगार राजेंद्र पांडुरंग जाधव (४१, रा. सध्या केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा, मूळ रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) व कामगार प्रवीण सुरेश राठोड (२७, रा. सध्या खंडाळा, मूळ रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी संबंधितांना मारहाण करीत शिवीगाळ केली. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे.

देवीलाल जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार, केसुर्डी येथील संजय ढमाळ यांना हॉटेलच्या गेटसमोरून बाजूला उभे राहा असे म्हटल्याचा कारणावरून चिडून जाऊन गावातील लोकांना फोन करून बोलावत होते. देवीलाल जाधव हा हॉटेलमध्ये कांदा कापत असताना हॉटेलबाहेर गोंधळ ऐकू आल्याने बाहेर आल्यानंतर केसुर्डी येथील योगेश दादासाहेब ढमाळ (२५) हा भांडणे मिटवायची आहेत, तर सुरी घेऊन कशाला आला असे म्हणत हात धरून पकडू लागल्यानंतर झालेल्या झटापटीमध्ये समोर उभे असलेल्या केसुर्डी येथील संजय ढमाळ यांच्या तोंडाला सुरी लागली, तर हातातील सुरी हिसकावून घेत असताना सुरी तुटल्याने तुटलेली सुरी घेऊन योगेश ढमाळ याने मारल्याने देवीलाल जाधव याच्या अंगठ्याजवळ जखम झाली. प्रशांत रमेश ढमाळ (२३, रा. केसुर्डी) याने लोखंडी रॉडने देवीलाल जाधव याला मारहाण केली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांतील सहाजणांना अटक केली आहे.

याची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहेत.

Web Title: Three injured in knife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.