शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: विचित्र अपघातात तीन चारचाकींचा चक्काचूर, खंडाळ्यात महामार्गावर दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:09 IST

केसुर्डी फाटा परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा

खंडाळा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पारगाव खंडाळा येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन विचित्र अपघातांत तीन चारचाकी वाहनांचा चक्काचूर झाला.पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चारचाकी (एमएच १४ ईवाय ६८७८) वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनाचा चक्काचूरझाला. चालकही गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे पुणे बाजूकडून येणारी महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.दरम्यान, या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये थांबलेल्या आणखी एका चारचाकी वाहनाला (एमएच १२ एलपी ७०२६) पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने (एमएच ११ बीव्ही ६९३३) जोरदार धडक दिली. या धडकेतही समोरील वाहनातील एकजण जखमी झाले व दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार राजू अहिरराव, पोलिस चालक दिग्विजय पोळ व शिरवळ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.केसुर्डी फाटा परिसर ठरतोय मृत्यूचा सापळाकेसुर्डी फाटा ते खंडाळा परिसरात वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी विजेची सोय नसल्याने महामार्गावर पूर्णपणे काळोख पसरलेला असतो. अशातच रस्त्याचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आजपर्यंत जीव गमावले असून, महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी विज उपलब्ध करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.