मोटारसायकलसह दोन मोबाईल घेऊन तिघांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:30+5:302021-09-05T04:44:30+5:30
लोणंद : खराडेवाडी (ता. फलटण) हद्दीतील बडेखान ते साखरवाडी रोडवर असणाऱ्या रेल्वे फाटकाजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी एका युवकाच्या मोटारसायकलसह ...

मोटारसायकलसह दोन मोबाईल घेऊन तिघांचे पलायन
लोणंद : खराडेवाडी (ता. फलटण) हद्दीतील बडेखान ते साखरवाडी रोडवर असणाऱ्या रेल्वे फाटकाजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी एका युवकाच्या मोटारसायकलसह दोन मोबाईल हिसकावून पलायन केले. अशी तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बडेखान ते साखरवाडी रस्त्यावर शुक्रवार, दि. ३ रोजी रात्री साडेआठच्यासुमारास अनुपा मुलाराम (वय २३, रा. तिरुपती, कोळकी फलटण) हा मोटारसायकल (एमएच ११ डीसी ४९५४) वरून प्रवास करत असताना, खराडेवाडी गावच्या हद्दीत आल्यावर अनोळखी मोटारसायकलवरील तिघांनी त्याला थांबवून ‘साखरवाडीला रोड कोणता जातो?’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांची मोटारसायकल, दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला.
याबाबतची माहिती मिळताच लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तपास करीत आहेत.