शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी ‘शिवशंकर’ पतसंस्थेच्या तीन संचालकांना पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 17:20 IST

पाच संचालक गजाआड : संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

कऱ्हाड : शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी तीन संशयित संचालकांना गजाआड केले आहे. तसेच याप्रकरणी अकरा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. यू. एल. जोशी यांनी फेटाळले आहेत. यापूर्वी या प्रकरणात दोन संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्या संचालकांची संख्या पाचवर पोहोचली आहे.शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल आहे. एप्रिल २०२४ मध्ये विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. उमेश वसंतराव मुंढेकर (वय ६६, रा. शनिवार पेठ), सतीश चंद्रकांत बेडके (वय ५४, रा. तेलीगल्ली, शनिवार पेठ), मनोज चंद्रकांत दुर्गवडे (वय ४२, रा. यशवंत हायस्कूल मागे, शनिवार पेठ, मूळ रा. मोरगिरी, ता. पाटण) यांना बुधवारी रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या तिघा संशयितांना दि. १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी याप्रकरणी शरद गौरीहर मुंढेकर आणि सुनील आनंदा काशीद या दोघांना अटक करण्यात आली होती.विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील लेखापरीक्षण झाल्यानंतर १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अकरा जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अन्य संशयितांना लवकरच अटक होईल, असे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी