कऱ्हाड : येथील शिवाजी स्टेडियमवर प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सध्या राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत आत्तापर्यंत तीन दिवसांत तीनशे बॅडमिंटनच्या मॅचेस झाल्या. या बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील शिवाजी स्टेडियमवर पाच दिवस सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंंटन निवड चाचणी स्पर्धेसाठी सुमारे ४५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभरात ३६ खेळाडंूनी स्पर्धेत विजय मिळविला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांमध्ये १७ वर्षांखालील मुलांमध्ये आर्या भिवपत्की, सर्वेश कुकडे, वंश सिंघ, निखिल वाडेकर, दीप रामभिया, सोनल नानडकर, अथर्व चुरी, गौरव मिथे, सोहम पाटील, अमन संजय, अजिंक्य पाथरकर आदी स्पर्धकांनी तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये अक्षय कदम, मिहीर पलांडे, अकेंद्र धरजी, ऋषभ देशपांडे, अनिरुद्ध मयेकर, साहिल लोखंडे, अभिषेक बोराटे, सिद्धेश देशमुख, सौरभ केरळकर, प्रसन्नजित शिरोडकर. १९ वर्षांखालील मुलींमध्ये स्वराली चिटणीस, सई नंदूरकर, मुग्धा आगे्र, रिया अरोळकर, वैदेही चौधरी, श्रेया भागवत, रुद्र राणे, सई गुल्हाणे, पूर्वा बर्वे, स्मिता तोष्णीवाल, अदिती कुटे, गौरी कुलकर्णी, रितीका ठक्कर, सई रेड्डी, पूजा देवळेकर या स्पर्धकांचा सहभाग असून, त्यांनी विजय तिसऱ्या दिवशी चाचणी स्पर्धेत विजय मिळविला. स्पर्धेत चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, धुळे, नागपूर, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चव्हाण, नीलेश फणसळकर, जावेद शेख परिश्रम घेत असून, मुख्य पंच विश्वास देसवंडीकर तसेच नऊ पंच काम पाहत आहेत. स्पर्धेसाठी ४५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)
तीन दिवसांत तीनशे सामने
By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST