शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

सातारा जिल्ह्यातून तिघे गुन्हेगार हद्दपार, दोन वर्षांसाठी बंदी; पोलिस अधीक्षकांची कारवाई 

By दत्ता यादव | Updated: April 5, 2023 19:29 IST

गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा...

सातारा : शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी, घरात घुसून दुखापत करणे आदी गुन्हे दाखल असणाऱ्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे.साैरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ (वय २३, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा), ओंकार रमेश इंगवले (२७, रा. देशमुख काॅलनी, करंजे पेठ, सातारा), मंदार हणमंत चांदणे (३२, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या तिघांकडून समाजात उपद्रव होत होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यामध्ये कसलीही सुधारणा होत नव्हती. त्यांच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या तिघांवर असलेल्या गुन्ह्यांचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर अधीक्षकांनी या तिघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाइक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावे सादर केल्याने संशयितांवर कारवाई झाली.

गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा...नोव्हेंबर २०२२ पासून सहा टोळ्यांमधील १६ व्यक्तींना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्याविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस