शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष बदलणार तीन मतदारसंघांचं ‘गणित’! -अंदाज बांधणे अंधारातील तीरासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:35 IST

आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात.

ठळक मुद्देक-हाड दक्षिण-उत्तर अन् माणमधील स्थिती; अटीतटीच्या तिरंगी लढतीचा परिणाम

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरीशीच्या लढती होत असल्यातरी कºहाड दक्षिण, क-हाड उत्तर आणि माणमध्ये तुल्यबळ असणारे अपक्षच स्वत:सह दुसऱ्यांचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यामुळे या तीन मतदारसंघांतील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज बांधणे सद्य:स्थितीत तरी अंधारात तीर मारण्यासारखे होईल.क-हाड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार, तर भाजपकडून डॉ. अतुल भोसले, अपक्ष उदयसिंह पाटील रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत चव्हाण आणि भोसले रिंगणात होते. त्यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे अपक्ष म्हणून उतरलेले. यावेळी त्यांचा मुलगा उदयसिंह हे खिंड लढवतात. आताही निवडणूक अटीतटीची होईल; पण यावेळी चुरस अधिक आहे. मागे पराभूत झाल्यानंतर भोसलेंनी मतदारसंघात बांधणी केली तसेच लोकसंपर्कही वाढवला. त्यांच्या पाठीमागे युतीची ताकद आहेच. त्याचबरोबर त्यांचा गटही येथे मजबूत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अस्तित्वापेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण देशपातळीवर नेतृत्व करणाºया चव्हाणांना पुन्हा विजय मिळवावाच लागेल. येथे काँग्रेसमधील काहीजण भाजपात गेलेत. तरीही चव्हाण जोरदारपणे खिंड लढवतात. त्यांच्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद राहील. तर मतदारसंघ उंडाळकरांचा बालेकिल्ला राहिलेला. या जोरावर उदयसिंहांनाही गट मजबूत करणे व अस्तित्वासाठी निकराची लढाई लढावी लागतेय. उदयसिंह पाटील किती मते घेतात, यावरच त्यांच्यासह चव्हाण आणि अतुल भोसलेंचेही गणित अवलंबून असेल.

क-हाड उत्तरमध्ये कोणाचे पारडे जड राहणार? हे आता सांगणे कठीण आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेनेकडून धैर्यशील कदम तर अपक्ष म्हणून भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे आहेत. २०१४ लाही या तिघांतच सामना रंगलेला. यावेळचा फरक म्हणजे पाटील राष्ट्रवादीतच असून, कदमांनी ‘हात’ सोडून बाण घेत नेम धरलाय. तर मतदारसंघ सेनेकडे गेल्याने घोरपडे अपक्ष उभे राहिलेत. आमदार पाटलांचा हा बालेकिल्ला राहिलाय. स्वत:बरोबरच पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, काँग्रेसमधील काहीजण कदम आणि घोरपडेंबरोबर आहेत. याठिकाणी आघाडीत बिघाडी झालीय. त्यामुळे पाटलांची दमछाक होऊ शकते. तर धैर्यशील कदम यांच्यासाठी युतीची ताकद आहे. तसेच त्यांचा एक गटही जमेची बाजू ठरलीय. अपक्ष मनोज घोरपडेंनी यावेळीही निवडणुकीत रंगत आणलीय. गावोगावी जाऊन चांगला संपर्क वाढवलाय. मागीलवेळची तिघांचीही मते पाहता आता कोण वरचढ ठरेल, हे सांगता येत नाही. घोरपडेंच्या मतावरच कोणाच्याही जय-पराजयाचा तराजू राहणार आहे.

देशमुखांना पाठिंबा बोलण्यातून का कृतीतून...माण मतदारसंघात माजी आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या भावातच निवडणुकीचे द्वंद्व होईल, अशी स्थिती सुरुवातीला होती; पण नंतर ‘आमचं ठरलंय’मधून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख रणांगणात उतरले. त्यांना ‘आमचं ठरलंय’मधील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपक्ष देशमुख यांनी भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासमोर खऱ्या अर्थाने कडवे आव्हान उभे केले आहे.

जयकुमारांच्या मागे भाजपची ताकद आहे; पण यामध्येही फाटाफूट झालीय. तर गेली दहा वर्षे आमदार असल्याने ते मजबूत गट बांधून आहेत. विकासकामे आणि पाणी आणल्याच्या मुद्द्यावर ते मतदारांना सामोरे जातायत. शेखर गोरे यांचाही स्वत:चा गट आहे. शिवसेनेची असणारी ताकद मागे आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी केलेली तयारी त्यांना कुठपर्यंत घेऊन जाते, ते पाहावे लागेल. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादीचे.आता अपक्ष उतरलेत. त्यांना मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे; पण हा पाठिंबा बोलण्यातून आहे की करणीतून हे कळायला मार्ग नाही. जर सर्वपक्षीय नेत्यांचा तन, मन, धनाने पाठिंबा राहिल्यास देशमुख दोघा बंधूंना भारी ठरू शकतात. देशमुख किती मते घेणार? यावरच गोरे बंधूंसह त्यांचेही अस्तित्व अवलंबून असेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक