अर्पण ग्रुपतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी हजारो सीडबॉल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:21+5:302021-06-16T04:50:21+5:30

वाई : वाई शहराची सुसंस्कृती आणि पर्यावरण यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या अर्पण ग्रुपने पुन्हा एकदा, पर्यावरणात चांगले बदल घडवून ...

Thousands of Seedballs for Environmental Conservation by Arpan Group! | अर्पण ग्रुपतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी हजारो सीडबॉल!

अर्पण ग्रुपतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी हजारो सीडबॉल!

वाई : वाई शहराची सुसंस्कृती आणि पर्यावरण यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या अर्पण ग्रुपने पुन्हा एकदा, पर्यावरणात चांगले बदल घडवून आणण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि नवनवीन झाडे येण्यासाठी या ग्रुपने ‘सीडबॉल मेकिंग’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमात माती आणि शेणखत यांचे मिश्रण करून त्यांचा गोळा केला जातो व त्यामध्ये कोणत्याही झाडाची बी टाकली जाते. हे गोळे वाळवून ठेवले आणि पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या अगोदर योग्य ठिकाणी टाकले की त्यापासून नवनवीन झाडांची निर्मिती होते. बहुतेककरून गिर्यारोहणाला (ट्रेकिंग) जाणारे लोक सीडबॉलला पसंती दर्शवितात. आतापर्यंत अर्पण ग्रुपने तीन हजारांहून अधिक सिडबॉल्स बनवले आहेत. त्यामध्ये गुलमोहर,जांभूळ, चिंच, सीताफळ अशा छायावर्धक व फळ झाडांच्या बियांचा समावेश आहे. या कार्यात ग्रुपचे सर्व सदस्य पंकज खागे, प्रतीक सरकाळे, निखिल कारळे, चेतन अनपट, आर्यन गायकवाड, प्रतीक गायकवाड, मंदार पाचंगे, मृणाल गव्हाणे, विद्या जमदाडे, सोहम देशमाने, साहिल देशमाने, मितेश महांगडे, अनिकेत गाढवे या सर्वांचे योगदान आहे.

कोट..

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून आपल्याला अविरत ऑक्सिजन देणारी झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आम्ही लॉकडाऊनचा सदुपयोग करून सीडबॉल तयार करण्याचा संकल्प केला. वाई परिसरातील डोंगरावर हे सीडबॉल आम्ही टाकणार आहोत. तरुणांनी मोकळा वेळ विनाकारण मोबाईलवर न घालवता विधायक काम केले पाहिजे.

-मृणाल गव्हाणे, सदस्य, अर्पण ग्रुप

Web Title: Thousands of Seedballs for Environmental Conservation by Arpan Group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.