‘त्या’ आमदारांचा शिरवळमध्ये मुक्काम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:13 IST2019-07-10T00:13:24+5:302019-07-10T00:13:30+5:30
शिरवळ : कर्नाटकमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना काँग्रेस आणि जनता दल (एस) चे आमदार मुंबईतून गोव्याकडे जाताना शिरवळ ...

‘त्या’ आमदारांचा शिरवळमध्ये मुक्काम!
शिरवळ : कर्नाटकमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना काँग्रेस आणि जनता दल (एस) चे आमदार मुंबईतून गोव्याकडे जाताना शिरवळ परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताला भाजप पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.
कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (एस) चे काही आमदार शनिवारपासून मुंबईत होते. तेथून ते गोव्याला जाणार होते; पण विमानात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हे आमदार रस्ते मार्गाने निघाले. त्यावेळी शिरवळ परिसरातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. विशेष म्हणजे संबंधित आमदारांची देखरेख ठेवणाºया सातारा जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याबाबत ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याचे दिसते. यामध्ये रामलिंगा रेड्डी, डॉ. सुधाकर, रोशन बेग, अंजली निंबाळकर, एमटीबी नागराज, संगमेश्वरा, शिवन्ना, फातिमा, बी. नागेंद्र, राजगौडा, रामाप्पा अशी आमदारांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.