ते नेते आता तुरुंगात जातील!

By Admin | Updated: January 23, 2015 00:36 IST2015-01-22T23:40:06+5:302015-01-23T00:36:02+5:30

लोणंद : बाळासाहेब बागवानांच्या एकसष्ठी सोहळ्यात राष्ट्रवादीला टोला

Those leaders will now go to jail! | ते नेते आता तुरुंगात जातील!

ते नेते आता तुरुंगात जातील!

लोणंद : ‘जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी येणार नाही, असे फलटणचे आमदार सांगत होते. त्यांच्यासमोरच माण-खटावमध्ये पाणी नेण्यात मी यशस्वी झालो. निवडणुकीतील त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे दोघांनाही सत्तेपासून लांब राहावे लागले. आम्ही किमान घरी बसलो ते मात्र आता तुरुंगात बसतील,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना लगावला.लोणंद येथे काँग्रेसचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्या एकसष्ठी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, शंकरराव गाढवे, प्रल्हाद पाटील, रणजित निंबाळकर, बापूराव धायगुडे, स्वाती बरदाडे, अनिरुद्ध गाढवे, अजय धायगुडे, अनिता शेळके, विठ्ठल शेळके, राजू कदम, धनाजी अहिरेकर, भरत शेळके, मुबीन बागवान, अशोक डोईफोडे, शैलजा खरात, देवती डोईफोडे, नंदा गायकवाड उपस्थित होते. यावेळी जयकुमार गोरे व रेखा खरात यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘हार-तुऱ्यांमध्ये न राहता सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारा बाळासाहेब बागवान हा नेता आहे. खंडाळा तालुक्यात पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला आहे. धरणे, कालवे बांधणे हे ठेकेदारांच्या हिताचे धोरण आहेत. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न न सुटता हजारो कोटी वाया गेले आहेत. या पैशांची वाटणी मात्र आम्ही पंधरा तालुक्यांत बंधारे बांधून जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यांचे चांगले निकाल येत आहेत.’ अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. आणि पाणीप्रश्नावर लढण्याचे सामर्थ्य मिळाले. म्हणूनच पाणी पंचायत व माथाडी बोर्डाची स्थापना केली.’
यावेळी एस. वाय. पवार, भरत शेळके, शंकरराव गाढवे, आनंदराव पाटील, नंदा गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी दयानंद खरात, चंद्रकांत भंडारी, महंमद कच्छी, शामसुंदर डोईफोडे, इम्रान बागवान, सोपान क्षीरसागर, मस्कूअण्णा शेळके, अरुण गालिंदे, अ‍ॅड. बबलू मणेर, गणीभाई कच्छी, तुकाराम क्षीरसागर, लक्ष्मण शेळके, दिलीप घाडगे, बापूराव क्षीरसागर, दादू केसकर आदी उपस्थित होते. राहुल घाडगे यांनी स्वागत केले. संजय जाधव, रघुनाथ शेळके यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

नगरपंचायतीसाठी प्रयत्न करणार : चव्हाण
‘युती शासनाने धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. त्यांच्याच आदिवासी विकास मंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितले,’ असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘लोणंदचे वाटोळे व्हावे, असे वाटत असणाऱ्यांमुळेच लोणंद नगरपंचायत झाली नाही. यामुळे लोणंदचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, लोणंद नगरपंचायतीसाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे.’

Web Title: Those leaders will now go to jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.