बत्तीस वर्षांनंतरही जपले मैत्रीचे ऋणानुबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:41+5:302021-02-06T05:14:41+5:30
काशीळ येथे हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.एम. पाचपुते, पी.के. साळुंखे, सध्याचे मुख्याध्यापक ...

बत्तीस वर्षांनंतरही जपले मैत्रीचे ऋणानुबंध
काशीळ येथे हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यास विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही.एम. पाचपुते, पी.के. साळुंखे, सध्याचे मुख्याध्यापक ए.आय. चौधरी, माजी शिक्षक एस.आर. कांबळे, एन.एल. पाटील, माजी केंद्रप्रमुख माळी, कर्मचारी भगवान कांबळे आदींसह सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी जितेंद्र खिलारे, सुनील बाबर, भास्कर चव्हाण, संभाजी वाघमारे, शैलजा सूर्यवंशी, शारदा सूर्यवंशी, शब्बीर मुजावर आदी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी जुन्या-नव्या आठवणींना उजाळा दिला. तर, भविष्यातही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहून प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होऊ, अशी ग्वाही सर्वांनी दिली. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, लावणी नृत्यावर मैथिली गणेश बोबडे हिने उपस्थितांची वाहवा मिळवली. तर, भाग्यश्री गणपत चव्हाण हिने रिमिक्स गाण्यावर नृत्य करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली. आपापल्या पद्धतीने तुम्ही पद, पैसा, प्रतिष्ठा कमावले आहे. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करताना नियमित व्यायाम करून आपले आरोग्य जपा, असे आवाहन व्ही.एम. पाचपुते यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी जितेंद्र पवार, संजय चव्हाण, रामचंद्र पाटील, संजय नलवडे, प्रताप पवार, अनिल पाटील, गणेश बोबडे आदींनी परिश्रम घेतले. निरंजन सावंत यांनी प्रास्ताविक केले. गोरख गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संगीता चव्हाण, शशिकांत पवार, महेंद्र जाधव आदींनी स्वागत केले. तर, उमेश पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०५केआरडी०२
कॅप्शन : हेळगाव, ता. क-हाड येथील पंचक्रोशी दत्त विद्यामंदिरातील माजी विद्यार्थी ३२ वर्षांनंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटले. यावेळी माजी शिक्षकही उपस्थित होते.