हातापेक्षा बळकट ठरली पायाची बोटं!

By Admin | Updated: June 19, 2014 00:46 IST2014-06-19T00:42:23+5:302014-06-19T00:46:43+5:30

अपंगत्वावर जिद्दीने मात : दुधेबावीच्या ऋषिकेश मोरेने मिळविले ८७ टक्के गुण

Thing is stronger than the hand! | हातापेक्षा बळकट ठरली पायाची बोटं!

हातापेक्षा बळकट ठरली पायाची बोटं!

कोळकी : जिद्द, चिकाटी अन् वाटेत येणाऱ्या संकटांना भिडण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस पहाडालाही टक्कर देऊ शकतो, याचे एक उदाहरण दहावीच्या निकालानंतर पाहायला मिळाले. जन्मजातच दोन्ही हात नसलेल्या आणि एक पायाने अपंग असलेल्या ऋषिकेश मोरे या विद्यार्थ्याने पायाने पेपर लिहून दहावीच्या परीक्षेत ८७ टक्क्यांचा झेंडा रोवला.
फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण मोरे यांचा ऋषिकेश हा मोठा मुलगा. मुधोजी विद्यालयात शिकणारा ऋषिकेशला दोन्ही हात नाही. तसेच उजव्या पायालाही अपंगत्व आल्यामुळे त्याचे आयुष्य परावलंबी बनले होते. नशिबाने ऋषिकेशच्या वाट्यात अपंगत्व टाकले. मात्र, त्याचा बाऊ न करता तो मोठ्या जिद्दीने शिकतोय.
दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवायचेच, असा मनाशी चंग बांधून ऋषिकेशने अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते. सकाळी पाच वाजता उठून सातवाजेपर्यंत अभ्यास, त्यानंतर क्लास व अकरा ते साडेपाच शाळा करून घरी आल्यानंतर थोडावेळ खेळ, होमवर्क व त्यानंतर सायंकाळी आठ ते बारा पुन्हा अभ्यास असे त्याचे वेळापत्रक ठरलेले होते. शरीराने धडधाकट असणाऱ्यांसमोर अपंग ऋषिकेशने एक आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Thing is stronger than the hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.