शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्यामुळे रात्री झोपताना दरवाजा उघडा ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात, भुईंज येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:44 IST

सातारा : सध्या उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री झोपताना दरवाजातून हवा आतमध्ये यावी, यासाठी अनेकजण दरवाजा उघडा ...

सातारा : सध्या उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री झोपताना दरवाजातून हवा आतमध्ये यावी, यासाठी अनेकजण दरवाजा उघडा ठेवत आहेत. मात्र, हीच संधी साधून चोरटे आपला डाव साधत आहेत. असाच काहीसा प्रकार भुईंजमधील मालदेववाडी येथे घडला असून, चार चोरट्यांनी घरातील पैसे आणि दागिने चोरून नेले. मात्र, झोपेत असलेल्या दाम्पत्याला याचा कसलाच थांगपत्ता लागला नाही.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज येथील मालदेववाडी येथे विठ्ठल लक्ष्मण मोरे (वय ७५) आणि त्यांची पत्नी वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री या दाम्पत्याने झोपताना मुख्य दरवाजा उघडा ठेवला होता. तर सेफ्टी दरवाजा आतून कडी घालून बंद केला होता. मात्र, चोरट्यांनी सेफ्टी दरवाजातून हात घालून अलगद कडी काढली. त्यानंतर दबक्या पावलाने साऱ्या घरात फिरून कपाट, डबे चोरट्यांनी उचकटले. एवढेच नव्हे तर वृद्धेने उशाला गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवली होते. तेही चोरट्यांच्या हाती लागली. चोरटे घरबर फिरले. तरी सुद्धा गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याला कसलीही चाहूल लागली नाही.सकाळी जेव्हा जाग आली. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. घरातील पैसे आणि दागिणे असा सुमारे ४० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सेफ्टी दरवाजाला कडी ऐवजी कुलूप लावले असते तरी चोरट्यांना घरात येता नसते. मात्र, उकाड्यामुळे नागरिक अशा प्रकारचे बारकावे विसरून जात आहेत. परिणामी अशी चोरीची घटना घडल्यानंतर त्यांना पश्चातापाला सामोरे जावे लागत आहे. या घटनेची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी