प्रतापसिंह शेती फार्ममधील ऊस चोरट्याने पेटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:45+5:302021-02-05T09:20:45+5:30
सातारा : येथील राधिका रस्त्यावर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह सेंद्रिय शेती फार्ममध्ये असणारी ऊसशेती अज्ञात चोरट्याने पेटवून दिली. ...

प्रतापसिंह शेती फार्ममधील ऊस चोरट्याने पेटवला
सातारा : येथील राधिका रस्त्यावर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह सेंद्रिय शेती फार्ममध्ये असणारी ऊसशेती अज्ञात चोरट्याने पेटवून दिली. यावेळी चोरट्याने रोपवाटिकेचे नुकसान करीत लोखंडी पाईपही चोरून नेले. तसेच कार्यालयातील काचाही फोडल्या. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राधिका रस्त्यावर प्रतापसिंह सेंद्रिय फार्म आहे. येथे रविवार, २४ रोजी रात्री साडेसहा ते सोमवार,२५ रोजी सकाळी साडेनऊ या वेळेत चोरट्याने आत प्रवेश करून ऊस शेतीला आग लावली. यात २० हजार रुपयांचे नुकसान झाले. यानंतर चोरट्याने कार्यालयातील काच फोडत रोपवाटिकेतील विविध प्रकारची रोपटी अस्ताव्यस्त करून त्याचे नुकसान केले. वीस फूट लांबीचे पाच लोखंडी पाईपही चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अजित जनार्दन शेवते ( ४२, रा. केसरकर कॉलनी, व्यंकटपूरा पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.