शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज केला लंपास, कोयना वसाहतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:36 IST

आगाशिवनगर, मलकापूरसह कोयनावसाहत परिसरात चोरीच्या घटनामध्ये वाढ

माणिक डोंगरेमलकापूरः कोयनावसाहत येथील दोन अपार्टमेंट मधील तीन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. यात १० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. कोयनावसाहत ता. कराड येथील रायगड या अपार्टमेंटमध्ये काल, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अमीत महापूरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोयनावसाहत येथील पाचमंदिर परिसरात राजगड अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये अमित महापूरे हे काही वर्षांपासून कुटूंबासह राहतात. मंगळवारी ते कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते. दरम्यान चोरट्यानी बंद फ्लॅटचा कोयडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करत सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्यावर डल्ला मारला. नंतर शेजारील बिल्डिंगमध्येही दोन फ्लॅट फोडले. मात्र त्या ठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एस. पवार, हवालदार संजय जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.चोरट्यांचा धुमाकूळआगाशिवनगर, मलकापूरसह कोयनावसाहत परिसरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशातच काल, मंगळवारी कोयनावसाहतमध्ये चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले. त्यामुळे बंद घर फोडण्याचे सत्र सुरुच आहे. 

नागरिकांचे दुर्लक्ष, पोलिसांची चालढकललहान लहान चोरीच्या घटनामध्ये पोलिसांचा ससेमीरा नको म्हणून नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. अनेक घटनांमधील चोरीचे तपासाचे पुढे काय झाले त्याचा पत्ता नाही. चोरीच्या घटनांबाबत पोलिस चालढकल करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी