शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रुग्णाला भेटायला गेले, चोरट्यांनी बंद घर फोडून दागिन्यासह पूजेचे साहित्य लंपास केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:57 IST

लोणंद शहरात चोरट्यांचा धुमाकूळ 

सातारा : लोणंद शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चांदीचे पूजेचे साहित्य लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घरातील मंडळी नात्यातील आजारी रुग्णाला भेटण्यासाठी परगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच पूजेतील चांदीचे साहित्य असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.सकाळी परत आल्यावर घराची अवस्था पाहून घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मुद्देमालाची अचूक किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.बंद घरे लक्ष्यगेल्या काही दिवसांत लोणंद परिसरात घरफोड्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांची गस्त असूनही चोरट्यांनी उघडपणे बंद घरे टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. ‘पोलिसांनी ठोस पावले उचलून चोरट्यांना धडा शिकवावा’ अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सुरक्षा साधनं वापरावीतदीर्घकाळासाठी घर बंद ठेवायचे असल्यास शेजाऱ्यांना कळवावे. घराचे दरवाजे, खिडक्या मजबूत कुलूपबंद कराव्यात. सीसीटीव्ही व अलार्म सिस्टीमचा वापर करावा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी केले आहे.