सदरबझारमध्ये बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST2021-03-06T04:37:16+5:302021-03-06T04:37:16+5:30

सातारा : येथील सदरबझार परिसरात असलेल्या उत्तेकरनगर परिसरातील शिवसागर अर्पाटमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील दोन बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा ...

Thieves broke into a closed flat in Sadar Bazaar | सदरबझारमध्ये बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले

सदरबझारमध्ये बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले

सातारा : येथील सदरबझार परिसरात असलेल्या उत्तेकरनगर परिसरातील शिवसागर अर्पाटमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील दोन बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अरुण यशवंत माने (रा. शिवसागर अर्पाटमेंट, मोरे नर्सिंग होमसमोर, सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार माने यांच्या मालकीचे शिवसागर अर्पाटमेंटमध्ये वरच्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. हे दोन्ही फ्लॅट बंद असताना दि. २ रोजी दुपारी दोन ते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी बाथरूममधील दहा हजार रुपये किमतीचे दोन मिक्‍सर, दीड हजार रुपये किमतीचे पाच नळ असा साडेअकरा हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक झेंडे करत आहेत.

Web Title: Thieves broke into a closed flat in Sadar Bazaar