शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

चोरट्यांनो रस्त्यावर या, पोलीस वाट पाहतायत!

By admin | Updated: May 23, 2014 22:55 IST

खाकीची ‘आयडिया’ची कल्पना : वाहनांसह कागदपत्रांची तपासणी; मोहीम होणार का फत्ते?

 संजय पाटील; कºहाड : पोलीस खातं जे बोलतं ते करत नाही आणि जे करायचं असतं ते बोलून दाखवत नाही, असं म्हणतात; पण कºहाडच्या पोलिसांनी सध्या नेमकं याच्या उलट केलंय. वाहनचोरांना पकडण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनांची तपासणी करण्याचं ‘मिशन’ त्यांनी हाती घेतलंय. मात्र, मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांनी त्याचा गाजावाजा केलाय. जे गोपनीय पद्धतीने करायचं तेच त्यांनी बोलून दाखवलंय. नुसतं बोलून नव्हे तर अगदी जगजाहीरच केलंय. त्यामुळं पोलिसांची चोर पकडण्याची ही ‘आयडिया’ निव्वळ कल्पनाच ठरण्याची चिन्हं आहेत. वाहनचोरी ही जिल्ह्यातल्या प्रत्येक शहराची डोकेदुखी आहे़ रस्त्याकडेला, गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली वाहनं हातोहात लंपास केली जातायत. चोरीस जाणार्‍या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे आणि एकदा दुचाकी चोरीस गेली की ती मिळेल की नाही, हेसुद्धा सांगता येत नाही़ दुचाकी चोरीस गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतो़ त्याच्या तक्रारीनुसार चोरीची ‘एफआयआर’ही दाखल होते; पण पुढे त्याचं काहीच होत नाही़ चोरीस गेलेली दुचाकी शोधणं पोलिसांनाही जिकिरीचं बनतं़ एखाद्या वेळी दुचाकीचोरांची साखळी उघडकीस आलीच तर अपवाद वगळता ठरवून अशी कारवाई होत नाही. खबर्‍याकडून खबर मिळाल्यानंतर अथवा वाहन तपासणीदरम्यान संशयास्पद दुचाकी किंवा कागदपत्रं आढळून आल्यानंतर चोरीची दुचाकी पोलिसांच्या हाती लागते़ एकापाठोपाठ अनेक दुचाकी त्या चोरट्याकडून हस्तगत होतात़ कºहाड शहर पोलिसांनी यापूर्वीही अशी टोळी उघडकीस आणली आहे; पण वाहनचोरांना पकडण्यासाठी व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सध्या नवीनच क्लृप्ती लढवली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने दोन दिवसांपासून वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेनुसार शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकाचौकात पोलीस कर्मचार्‍यांकडून वाहनांची तपासणी केली जातेय. वाहनाची स्थिती तसेच कागदपत्रं यावेळी तपासली जातायत. वास्तविक, ही मोहीम परिणामकारक असली तरी ती राबवताना पोलिसांनी गोपनीयता बाळगणं आवश्यक होतं. मोहिमेचा डंका पिटण्याची आवश्यकता नव्हती. अचानकपणे ही मोहीम राबविली गेली असती तर वाहनचोरीचे प्रकार उघडकीस येण्यास कदाचित मदत झाली असती; पण पोलिसांनी मोहिमेस सुरुवात होण्यापूर्वीच तिचा गाजावाजा केला. २१ मेपासून या मोहिमेस प्रारंभ होत असताना दोन दिवस अगोदरच पोलिसांनी या मोहिमेची ‘प्रेस नोट’ प्रसिद्धीमाध्यमांना दिली. कोणत्या तारखेला, कोणत्या वाहनाची आणि कोणती तपासणी करण्यात येणार, याचे नियोजनच पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवलं. वाहनधारकांनी या मोहिमेवेळी आपल्या वाहनांची कागदपत्रं सोबत ठेवावीत; तसेच वाहनही सुस्थितीत ठेवावे, असं आवाहन पोलिसांनी केलं. पोलिसांच्या वाहन तपासणीचं हे ‘नियोजन’ जगजाहीर झाल्यामुळं सामान्य वाहनधारकांसह चोरीचे वाहन वापरणारे किंवा वाहन, त्याची कागदपत्रं सुस्थितीत नसणारेही जागे झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत ही मोहीम चालणार, तोपर्यंत ते वाहन घेऊन रस्त्यावर येण्याचं टाळणार, हे मात्र निश्चित!