गोपूजमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST2021-03-06T04:37:30+5:302021-03-06T04:37:30+5:30

औंध : गोपूजमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, एका हॉटेलमध्ये चोरी, तर दुसऱ्या हॉटेलचे शटर उचकटून टाकण्याचा प्रयत्न झाला ...

Thieves are rampant in Gopuj! | गोपूजमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट!

गोपूजमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट!

औंध : गोपूजमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, एका हॉटेलमध्ये चोरी, तर दुसऱ्या हॉटेलचे शटर उचकटून टाकण्याचा प्रयत्न झाला असल्याने व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्टँड परिसरातील संध्या वडापाव नावाचे हॉटेल असून, मंगळवारी मध्यरात्री रोख रक्कम, तेल अशी अंदाजे दोन हजार रुपयांची चोरी झाली. तसेच पुसेसावळी रोडच्या प्रभू हॉटेलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शटर उचकटून आत जाण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे भुरटे चोर आसपासच्या परिसरातील असण्याची चर्चा सुरू आहे, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

Web Title: Thieves are rampant in Gopuj!