सिंगापूर चलनावर चोरट्याचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:02+5:302021-02-05T09:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील शाहूपुरीतील गेंडामाळमधील एका घरातून अज्ञाताने सिंगापूरचे चलन आणि सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी ...

सिंगापूर चलनावर चोरट्याचा डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील शाहूपुरीतील गेंडामाळमधील एका घरातून अज्ञाताने सिंगापूरचे चलन आणि सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शाहूपुरी येथील गेंडामाळ परिसरात गणेश हौसिंग सोसायटी आहे. येथील एका घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, सहा ग्रॅम वजनाचे कानातील दोन टॉप्स आणि सिंगापूर चलन, असा ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कुसुम चिंतामणी अंगडी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
...............................................