शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अंगावर रेनकोट, चेहऱ्याला मुखपट्टी; वाईत पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाखांचे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:42 IST

कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले.

वाई : सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन बंगाली कारागिरांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. रविवारी रात्री वाई येथे ही घटना घडली. याबाबत वाई पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाई येथील सोने-चांदी बाजारपेठेतील लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये सोन्याचे दागिने बनविणाऱ्या संजय जयंता मयंती आणि मृत्युंजय जयंता मयंती या दोन बंगाली कारागीर भावांची दुकाने आहेत. या ठिकाणी दररोज ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत असतात. रविवारी रात्री बाजारपेठ बंद झाल्याचा गैरफायदा घेऊन पावसाळी कपडे व चेहऱ्याला मुखपट्टी लावलेल्या दोन अज्ञात युवकांनी सुरुवातीला संजय जयंता मयंती याच्या दुकानात प्रवेश केला. शटर अर्ध्यावर घेऊन कोयत्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवून एका कामगाराला कोयत्याने किरकोळ मारहाण केली. दुकानात कामासाठी असलेले ३७८ ग्रॅम वजनाचे २५ लाख ९५ हजार ६०० रुपयांचे सोने ताब्यात घेतले. संजय मयंती याला व त्याच्या कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले. यानंतर लगतच असलेल्या त्याचा भाऊ मृत्युंजय जयंती याच्या दुकानात प्रवेश करून कोयता पिस्तुलाचा धाक दाखवून २०० ग्रॅम वजनाचे १३ लाख ७५ हजार किमतीचे सोने घेऊन पलायन केले.विष्णू मंदिर चौकात उभ्या केलेल्या दुचाकीवरून ते निघून गेले. या प्रकरणात कारागीर आणि व्यापारी यांचे मिळून ३९ लाख ६९ हजार रुपयांचे सोने लुटून नेल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात संजय मयंती यांनी दाखल केला आहे.याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अमोल गवळी, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ दाखल झाले. रात्रीपासून कसून तपास सुरू आहे. घटनास्थळी लवकरच आम्ही संशयितांना ताब्यात घेऊ, असे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर विभाग सुनील फुलारी यांनी वाईला भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.ग्रामसुरक्षा यंत्रणेवरूनही दिले संदेशवाई बाजारपेठेत चोरी झाल्यानंतर लगेचच रात्री साडेदहा वाजता ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून सर्वांना संदेश देण्यात आला. चोरट्यांचे वर्णन करून संबंधित चोरटे कोठे दिसल्यास जवळच्या पोलिस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अजूनही चोरटे हाताला लागलेले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस