बंगला फोडून ६० हजारांची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:18+5:302021-09-17T04:46:18+5:30

सातारा : येथील शाहूनगर गाेडोली परिसरातील शिवम बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६० हजार रुपयांची रोकड आणि साहित्य चोरून ...

They broke into the bungalow and stole Rs 60,000 in cash | बंगला फोडून ६० हजारांची रोकड लांबविली

बंगला फोडून ६० हजारांची रोकड लांबविली

सातारा : येथील शाहूनगर गाेडोली परिसरातील शिवम बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील ६० हजार रुपयांची रोकड आणि साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

याबाबत सचिन यशवंत शिंदे (४०, रा. शिवाजी हाैसिंग सोसायटी, सदर बझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या सासू दीपलक्ष्मी घाटगे (६२) यांचा शाहूनगर येथे शिवम बंगला आहे. हा बंगला दि. ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत बंद होता. याचदरम्यान चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि दागिने तसेच इतर साहित्यही चोरट्यांनी लंपास केले. बुधवारी दुपारी हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. कदम हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: They broke into the bungalow and stole Rs 60,000 in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.