कुडाळ परिसरातील शेतीपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:07+5:302021-02-05T09:18:07+5:30

कुडाळ: ‘कुडाळ परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी होणारा वीजपुरवठा सुरळीत केला असून, याबत शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील ...

There will be smooth power supply for agricultural pumps in Kudal area | कुडाळ परिसरातील शेतीपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा होईल

कुडाळ परिसरातील शेतीपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा होईल

कुडाळ: ‘कुडाळ परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी होणारा वीजपुरवठा सुरळीत केला असून, याबत शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील आणि शेतीसाठी नियमित वीज उपलब्धता कशी राहील, याची दक्षता घेतली जाईल,’ असे आश्वासन महावितरणचे उपकार्यकरी अभियंता सचिन बनकर यांनी दिले.

शेतकरी संघटनेच्या वतीने नुकताच मेढा येथे उपकार्यकारी अभियंता सचिन बनकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख कमलाकर भोसले, तालुकाध्यक्ष विकास मोहिते, मनोज वंजारी, भिकू राक्षे, भाऊराव शेवते, रवी शिंदे, किरण तरडे आदी मान्यवर व शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

बनकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी वीजपुरवठा नियमित व्हावा, यासाठी वरिष्ठ पातळीवरील पाठपुरावा केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कर्मचारी आणि सहकारी अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन शेतीपंपाचा वीजप्रश्न सोडवला आहे. शेतकरी बांधवांसाठी वीजबिलाच्या ५० टक्के रक्कम भरण्याची योजना आहे. याचा लाभ घ्यावा आणि वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे. यापुढेही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.’

कमलाकर भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या समस्या जाणून महावितरणचे अधिकारी सचिन बनकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आज जावळीला लाभलेले आहेत. आपल्या कर्मचारी सोबत घेऊन त्यांनी आवश्यक ती कार्यालयीन व दुरुस्ती कामे केली आणि शेतीपंपाचा वीजप्रश्न सुरळीत केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर विभागांतील अधिकाऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा आणि शेतकरी बांधवांना सहकार्य करावे.’ यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Web Title: There will be smooth power supply for agricultural pumps in Kudal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.