प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष व्हावेत : यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:04+5:302021-05-03T04:34:04+5:30
वाठार निंबाळकर : ‘कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ पाहता तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विलगीकरण कक्ष होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन ...

प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष व्हावेत : यादव
वाठार निंबाळकर : ‘कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ पाहता तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विलगीकरण कक्ष होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन तहसीलदार समीर यादव यांनी केले.
विडणी (ता. फलटण) येथील कोरोना विलगीकरण कक्षात उद्योजक सचिन भोसले यांच्या वतीने रुग्णांसाठी औषधे देताना ते बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विडणी हायस्कूलचे सचिव सहदेव शेंडे, सचिन भोसले, उत्तमराव नाळे, डी. बी. चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
तहसीलदार यादव म्हणाले, ‘कोणत्याही घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आल्यावर ती घरी अथवा घराजवळ राहिल्यास त्याच्या घरातील इतर सदस्यांना संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. अशा अवस्थेत बाधित रुग्णाला घरातील इतर सदस्यांपासून दूर ठेवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातूनच ग्रामपंचायत व इतर सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था यांनी गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात पुढाकार घ्यावा.’
डॉ. नयन शेंडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस पाटील धनाजी नेरकर यांनी आभार मानले.